पुणे : १४० वर्षाची परंपरा असलेल्या रांका ज्वेलर्स परिवाराच्या पिंपळे सौदागरमधील कोकणे चौक येथे असलेल्या ११ व्या सुवर्ण दालनाचे नुकतेच शानदार उद्घाटन झाले. मार्च महिना हा स्त्री शक्तीचा गौरव करण्यासाठी सुपरिचीत आहे. याचेच औचित्य साधून या सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजी पासून नातीपर्यंतच्या महिला, मुली व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी रांका परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक नाना काटे, उच्च पदस्थ अधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने ग्राहकवर्ग उपस्थित होता.